प्रकृती खालावल्याने अभिनेते विक्रम गोखले रुग्णालयात दाखल
पुणे,दि.२३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत आहे. त्यातच त्यांना जलोदर झाल्यामुळे उपचारासाठी पाच दिवसांपासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.
SL/KA/SL
23 Nov. 2022