अभिनेता सैफ अली खान वर चाकू हल्ला, सहा जखमा, शस्त्रक्रिया सुरू…
मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर काल रात्री अडीच वाजता मुंबईतील खार येथील त्याच्या घरी चाकूने हल्ला करण्यात आला. सैफच्या मानेवर, पाठीवर, हातावर आणि डोक्यावर चाकू आहे. सैफला रात्री 3.30 वाजता लीलावती रुग्णालयात आणण्यात आले. जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.लीलावती हॉस्पिटलचे सीओओ डॉ. नीरज उत्तमानी सांगतात की, सैफवर सहा वेळा वार करण्यात आले होते. त्यातील दोन जखमा खोल आहेत. पाठीच्या कण्याजवळ एक जखम आहे.
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला असून वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलिस पथके तयार करण्यात आली आहेत. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, “हल्ल्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रांचही या घटनेचा सखोल तपास करत आहे.”
डॉ. निरज उत्तमानी यांनी सांगितले की, “शस्त्रक्रियेनंतरच आणखी अपडेट सांगता येईल. सैफ अली खान सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती लवकरच उपलब्ध होईल.”
SL/ML/SL
16 Jan. 2025