छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अभिनेते राहुल सोलापूरकरांनी केले वादग्रस्त विधान
अभिनेते राहुल सोलापूरकर त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी शिवाजी महाराजांनी स्वतःची आग्र्यातील कैदेतून केलेली सुटका ही लाच देऊन केली होती असा उल्लेख केला आहे. राहुल सोलापूरकर यांनी नुकतीच ही मुलाखत दिली. या मुलाखतीत राहुल सोलापूरकर म्हणाले, “पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत.शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती.मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरुपात सांगायचा म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं. मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो.सोलापूरकर यांनी केलेल्या दाव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून अनेकांनी सोलापूरकर यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.