शिवाजीनगरमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई

 शिवाजीनगरमध्ये बोगस डॉक्टरवर कारवाई

मुंबई, दि.२३ (एम एमसी न्यूज नेटवर्क): शिवाजीनगर परिसरात बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरवर मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत त्याला रंगेहाथ अटक केली. डॉ. दिलीप कृष्णपाल सिंह (वय ४९)असे या बोगस डॉक्टरचे नाव असून तो शिवाजीनगर गोवंडी येथील रहिवासी आहे.

गुन्हे शाखेच्या म.पो.उ.नि. माशेरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार कक्ष-६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक भरत घोणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने आणि मुंबई पालिकेचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर येथील डॉ. दिलीप सिंह यांच्या क्लिनिकवर छापा टाकला. तपासात डॉ. दिलीप सिंह बेकायदेशीरपणे रुग्णांवर उपचार करत असल्याचे स्पष्ट झाले.तपासणीत त्यांच्याकडे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील वैद्यकीय नोंदणी प्रमाणपत्र अथवा कोणतेही वैध परवाने नसल्याचे आढळले. तसेच, त्यांच्या ताब्यातून ६,१२० रुपये किमतीची औषधे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

फिर्यादी डॉ. रमेश गाढवे यांच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉ.दिलीप सिंह याच्या विरुद्ध वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ अंतर्गत कलम ३५, ३६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी डॉ. दिलीप सिंह याला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *