संसदीय आयुधे, समिती पध्दत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिल रोजी कृतीसत्र

 संसदीय आयुधे, समिती पध्दत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी २५ एप्रिल रोजी कृतीसत्र

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे सन्माननीय विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत सन्माननीय विधानपरिषद सदस्यांसाठी एकदिवसीय कृतीसत्राचे आयोजन विधानपरिषदेच्या उप सभापती मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार, दिनांक २५ एप्रिल, २०२३ रोजी सकाळी ११.०० ते ५.०० यावेळेत विधान भवन, मुंबई येथे करण्यात आले आहे. या कृतीसत्रात विविध संसदीय आयुधे, समिती पध्दत, विधेयके या विषयांवर तीन सत्रे होतील.

या कृतीसत्राचे उद्घाटन मा.ॲड. राहुल नार्वेकर, अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा तसेच मा.डॉ. नीलमताई गोऱ्हे, उप सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या शुभहस्ते तसेच मा.श्री. चंद्रकांत दादा पाटील, संसदीय कार्य मंत्री, मा.श्री. अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद, मा.श्री. रामराजे नाईक-निंबाळकर, वि.प.स. तथा माजी सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद, मा.श्री. प्रविण दरेकर, वि.प.स. तथा माजी विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानपरिषद, मा.ॲड. अनिल परब, वि.प.स. तथा माजी मंत्री, मा.श्री. शशिकांत शिंदे, वि.प.स. तथा माजी मंत्री, मा.श्री. जयंत पाटील, वि.प.स. आणि श्री. राजेन्द्र भागवत, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. Action Session for Legislative Council Members on 25th April

या कृतीसत्रासाठी वक्ते म्हणून डॉ. अनंत कळसे, सेवानिवृत्त प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विविध संसदीय आयुधे), डॉ. विलास आठवले, सह सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (समिती पध्दत) व श्री. विलास पाटील, सेवानिवृत्त प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधेयके) यांना निमंत्रित करण्यात आले असून प्रत्येक सत्राचे अध्यक्षस्थान अनुक्रमे मा.श्री. अशोक ऊर्फ भाई जगताप, वि.प.स., मा.श्री. कपिल पाटील, वि.प.स. आणि मा.श्री. एकनाथराव खडसे-पाटील, वि.प.स. तथा माजी मंत्री हे भुषवतील.

सन्माननीय विधानपरिषद सदस्यांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र विधानमंडळाचे प्रधान सचिव श्री. राजेन्द्र भागवत, सह सचिव श्री. शिवदर्शन साठ्ये, उप सचिव श्री. ऋतुराज कुडतरकर आणि वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक, श्री. निलेश मदाने, मा. उप सभापती महोदया यांचे खाजगी सचिव श्री. रविंद्र खेबुडकर आणि विशेष कार्य अधिकारी श्री. अविनाश रणखांब यांनी केले आहे.

ML/KA/PGB
21 Apr 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *