नाशिक शहरात धार्मिक स्थळावरील कारवाई, वातावरण तापले

नाशिक दि २२– शहरातील काठे गल्ली परिसरातील एका धार्मिक स्थळावरुन वातावरण तापले आहे. हे अनधिकृत धार्मिक स्थळ पाडण्यात यावे अशी मागणी हिंदूत्ववादी संस्थांकडून केली जात आहे. नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरामध्ये हे धार्मिकस्थळ आहे. यावरुन वाद वाढण्याची शक्यता आहे. मागील २५ वर्षापासून हे प्रकरण सुरु असून वर्षानुवर्षे हिंदूत्ववादी संघटनायासाठी पाठपुरावा करत होती. आता मात्र नासिक महापालिकाने अनधिकृत धार्मिक स्थळ हटवले नाही तर हिंदुत्ववादी संघटनानी आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर आता काठे गल्ली परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याच्या कारवाईला महापालिका प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.
नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एक धार्मिक स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन पालिकेला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे हा मुद्दा नाशिकमध्ये जोरदार तापण्याची शक्यता होतेय काठे गल्ली परिसरात अनधिकृत धार्मिक स्थळ उभारण्यात आल्याचा हिंदुत्ववादी संघटनांनी आरोप करण्यात आला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काठे गल्ली परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे या परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.
आमदार देवयानी फरांदे यांचा प्रशासनाला अल्टिमेटम
अनधिकृत धार्मिक स्थळा संदर्भात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला होता, मात्र त्या अगोदरच पालिका प्रशासन आणि पोलिसांनी अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई केल्याने मोर्चा स्थगित केला आहे, या ठिकाणी भाजपा आमदार देवयानी यांनी नाशिक महानगरपालिका प्रशासनाला आज दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टीमेटम त्यांनी दिला आहे, ४ वाजेपर्यंत अनधिकृत दर्गा हटवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, नाहीतर आम्ही आमची पुढची भूमिका मांडू असा इशारा देखील देवयानी फरांदे यांनी दिला आहे.
अफवांवर विश्वास ठेऊ नये मुस्लिम धर्मगुरूंचे आवाहन…
नाशिक शहरातील काठे गल्ली येथील धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडून गेल्या दोन तासांपासून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नाशिक शहरामध्ये वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहे. मात्र मुस्लिम धर्मगुरू मौलाना इब्राहिम आणि शेहर ए खतीब यांच्यासह काही धर्मगुरूंनी स्वतः अतिक्रमणाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यामुळे त्या ठिकाणी कोणतेही अनुचित घडले नसल्याचं सांगत त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे.