फिश करी मसाल्यात किटकनाशक आढळल्याने Everest वर कारवाई

 फिश करी मसाल्यात किटकनाशक आढळल्याने Everest वर कारवाई

मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय स्वयंपाकघरांमध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या Everest या मसाला उत्पादक कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारात नामुष्की सहन करावी लागली आहे. सिंगापूर फूड एजन्सी (SFA) ने गुरुवारी, एव्हरेस्टच्या फिश करी मसाला या लोकप्रिय भारतीय मसाल्याच्या ब्रँडची उत्पादने बाजारातून परत मागवून घेतली आहेत. या मसाल्यात इथिलीन ऑक्साईड हे एक कीटकनाशक आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिंगापूर फूड एजन्सीने आयातदार SP मुथिया आणि सन्स यांना सदर प्रकरणी निर्देश दिले आहेत.

SFAने स्पष्ट केले की इथिलीन ऑक्साईड हे अन्नामध्ये वापरण्यासाठी सुरक्षित नसतानाही, काहीवेळा कृषी उत्पादकांकडून निर्जंतुकीकरणासाठी याचा वापर रोपांवर केला जातो. जेव्हा या रोपांमधून पुढे विविध पदार्थ तयार होतात या इथिलीन ऑक्साईडचा काही अंश त्यातली शिल्लक राहू शकतो. काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कमी प्रमाण असल्यास लगेचच याचा आरोग्याला धोका निर्माण होत नाही पण सातत्याने असे पदार्थ आपल्या शरीरात जात असतील तर मात्र धोका संभवतो.

फिश करी मसाल्यात इथिलिन ऑक्साइडचं प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळून आल्याचं सिंगापूरमधील खाद्य सुरक्षा यंत्रणेनं म्हटलं आहे. त्यानंतर हे उत्पादन बाजारातून परत घ्यावे, असे निर्देश सिंगापूरमधील सरकारी यंत्रणांनी दिले आहेत.

इथिलीन ऑक्साईड हे रसायन मानवी वापरासाठी अयोग्य मानलं जातं. एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यामध्ये या रसायनाचं प्रमाण मर्यादेपक्षा अधिक आढळून आलं आहे. एव्हरेस्ट मसाले भारतातून सिंगापूरमध्ये आयात केले जातात. हाँगकाँगमधील सेंटर फॉर फूड सेफ्टी यंत्रणेनं या संदर्भात अलर्ट दिला होता. त्या अनुषंगानं सिंगापूर सरकारनं एव्हरेस्ट फिश करी मसाल्यावर निर्बंध लादले आहेत.

इथिलीन ऑक्साईड हे एक कीटकनाशक आहे. शेतमालावरील किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या कीटकनाशकाची धूम्रफवारणी केली जाते. सिंगापूरच्या नियमांनुसार मसाल्यांच्या उत्पादनांत एका मर्यादेपर्यंत या रसायनाचा वापर करण्यास परवानगी आहे, परंतु एव्हरेस्ट फिश करी मसाल्यातील इथिलीन ऑक्साईडचं प्रमाण आरोग्यास घातक होईल इतकं जास्त आहे

SL/ML/SL

20 April 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *