विधानसभा निवडणूकीच्या आचारसंहिते पूर्वी बोनस, सानुग्रह अनुदान जाहीर करण्याची मागणी

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आगामी विधानसभा निवडणूक 2024 च्या आचारसंहिते पूर्वी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सन 2024 दिवाळी बोनस / सानुग्रह अनुदान वीस टक्के अधिक चाळीस हजार रुपये जाहीर करण्याची मागणी
म्युनि्सिपल मजदूर संघाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सरचिटणीस प्रकाश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
अजितदादा पवार व पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वर्षी मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना 26 हजार रुपये इतका बोनस मिळाला होता. तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचा पगार बोनस म्हणून दिला होता. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनादेखील 26 हजार रुपये इतका बोनस मिळाला होता.
आजच्या महागाईचा विचार करून सरकारने व महापालिका प्रशासनाने यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी, अभियंते यांना 2024 ची दिवाळी आनंदी व उत्साहात साजरी करण्यासाठी सर्वाना सरसकट 20 टक्के अधिक रुपये 40 हजार बोनस, सानुग्रह अनुदान विधानसभा निवडणूक 2024च्या आचारसंहितेचि तारीख जाहीर होण्यापूर्वी बोनस / सानुग्रह अनुदान जाहीर करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार व मनपा आयुक्त डॉ.भूषण गगराणी यांच्याकडे एका निवेदणाद्वारे म्युनि्सिपल मजदूर संघाचे अध्यक्ष रामदासजी आठवले, सरचिटणीस प्रकाश कमलाकर जाधव व पदाधिकारी यांनी केली आहे.
SW/ML/PGB
16 Sep 2024