मुकेश अंबानी यांना धमकीचे मेल पाठवणाऱ्या आरोपीला अटक
मुंबई दि.3( एम एमसी न्यूज नेटवर्क) : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना २० कोटी नंतर २०० कोटी आणि मेलला प्रतिसाद देत नाही म्हणून ४०० कोटी खंडणीची मागणी आणि धमकीचे एकापाठोपाठ एक पाच ईमेल धाडणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी तेलंगणा येथून गजाआड केले आहे.
गणेश रमेश वानपाधरी असे या तरूणाचे नाव आहे.पोलिसांनी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ८ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
गेल्या आठवड्यात मुकेश अंबानींना धमकीचा पहिला ईमेल आला होता. त्यानंतर ३१ ऑक्टोबर आणि एक नोव्हेंबर या दोन दिवसात आणखी दोन ईमेल पाठवण्यात आले होते. पहिल्या मेलकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱ्यात २० कोटींऐवजी ४० कोटींची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर पाच दिवसांच्या कालावधीत मेल्सची संख्या आणि खंडणीची रक्कमही वाढत गेली.खंडणी न दिल्यास ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुंबई पोलीस, गुन्हे शाखा आणि सायबर क्राईम विभाग यावर तपास करत होते. अखेर मुंबई पोलिसांनी गणेश वानपाधरी याला तेलंगणा येथून अटक केली.
SW/KA/SL
4 Nov. 2023