पुण्यात सहा वर्षांच्या चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
पुण्यात चालत्या स्कूलबसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटेनमुळे पुणेकरांनी संताप व्यक्त केला. पुण्यातील वानवडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी आता वानवडी पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी संजय रेड्डी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पीडीत मुलगी चार दिवसांपूर्वी शाळेतून घरी आली तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली. वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे चौकशी केली. तेव्हा विद्यार्थी वाहतूक करणारे संजय अंकल यांनी अश्लील कृत्य केल्याची माहिती दिली. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, अशी माहिती तिने वडिलांना दिली. दरम्यान या प्रकरणी या घटनेत आणखी काही पीडित मुली आहेत का? याचाही तपास केला जात आहे.