दर्शना पवार हत्याकांडातील आरोपीला मुंबईतून अटक

 दर्शना पवार हत्याकांडातील आरोपीला मुंबईतून अटक

मुंबई दि.22( एम एमसी न्यूज नेटवर्क) : दर्शना पवार हत्याकांडाचा छढा लावण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथकं राहुलचा शोध घेत होते. तो वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. या प्रकरणाचा तपास सुरु असताना राहुलने हत्या केल्याची कबूली दिली नव्हती. मात्र, पुणे ग्रामीण पोलिसांचे पाच पथकं राहुलचा शोध घेत असल्याने त्याने दर्शना पवारची हत्या आपणच केल्याची कबुली दिली आहे.

दर्शना पवार आणि राहुल दोन्ही एकमेंकाचे नातेवाईक होते. तसंच ते अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची इच्छा होती. दोन्ही एमपीएससी चा अभ्यास करत होते. या परिक्षेत दर्शनाला आधी यश आलं. तिने वन विभागाची परिक्षा उत्तीर्ण केली. दर्शनाच्या घरच्यांनी तिच लग्न दुसऱ्या मुलासोबत जमवले. या कारणाने राहुल अस्वस्थ होता. त्याने एम पी एस सी परिक्षा उत्तिर्ण होण्यासाठी थोडा वेळ मागितला. मात्र राहुल दर्शनाच्या परिवाराकडून कोणताती प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

राहुल हंडोरे याचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथकं नेमली होती. ही सगळी पथकं मुंबई, सिन्रर, लोणावळा, नाशिक आणि पुणे याठिकाणी त्याचा तपास करत होती. पोलिसांनी दोघांचे फोन रेकॉर्ड काढून ते कोणाच्या संपर्कात होते त्याचा शोध पोलीस घेत होते. पोलिसांनी राहुलच लोकेशन देखील चेक केलं होतं. कोलकाता, बंगळूर आणि चंदिगड असं त्याचा लोकेशन दिसत होतं.

पोलिसांनी राहुलला पकडण्यासाठी त्याच्या कटुंबाचा आधार घेतला होता. त्याने प्रवसादरम्यान घरच्यांकडे पैशांची मागणी केली होती. पोलिसांच्या सांगण्यावरुन राहुलच्या कुटुंबाने त्याच्या अकाऊंटवर ५,०००, १५००, आणि ५०० रुपये पाठवले होते. राहुलचा फोन सुरु होण्याची वाट पोलीस पाहत होते. अखेर पोलिसांनी राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक केली आहे.

SW/KA/SL

22 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *