कंपनीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमातच सीईओचा अपघाती मृत्यू

 कंपनीच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमातच सीईओचा अपघाती मृत्यू

हैदराबाद, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : Vistex Asia या कंपनीच्या रौप्य महोत्सवी वर्षांच्या सेलिब्रेशनचा कार्यक्रम सुरु असताना झालेल्या अपघातात कंपनीचे सीईओ संजय शाह यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. याला कारणीभूत ठरला आहे तो सेलिब्रेशनचा आधुनिक हटके प्रकार. हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये मनाला चटका लावणारी ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विसटेक्स कंपनीचा सिल्व्हर ज्युबिली कार्यक्रम रामोजी फिल्मसिटीमध्ये (Ramoji Film City) आयोजित करण्यात आला होता. सोहळ्याला कंपनीचे अमेरिका स्थित सीईओ संजय शाह (५६ वर्षे) आणि कंपनीचे अध्यक्ष राजू दतला (५२ वर्षे) यांची खास उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या रूपरेषेनुसार, संजय शाह व राजू दतला हे दोघे एका झुलत्या लोखंडी पिंजऱ्यातून स्टेजवर उतरणार होते. क्रेनच्या सहाय्यानं हळूहळू हा पिंजरा स्टेजवर उतरवला जात होता. या पिंजऱ्याला सजवण्यात आलं होतं. त्याला रोषणाई करण्यात आली होती. कंपनीच्या कर्तृत्वाला साजेसा हा असा जल्लोष करण्याची योजना होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं.

शाह व दतला यांच्या एन्ट्रीसाठी असलेला पिंजरा ६ एमएम केबलच्या साहाय्यानं २५ फूट उंचीवर लटकवण्यात आला होता. बॉलिवूडच्या गाण्याच्या साथीनं कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाह व दतला यांना घेऊन पिंजरा खाली येत होता. हा पिंजरा हळूहळू खाली येत असताना अचानक केबल तुटली आणि पिंजऱ्यातून दोघेही स्टेजवर कोसळले. कंपनीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सुमारे ७०० कर्मचारी सहभागी झाले होते. कंपनीच्या अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून फिल्मसिटीच्या इव्हेंट मॅनेजरविरुद्ध अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा हे १५ फूट उंचीवरून पडले होते आणि खालीचा मजला काँक्रिटचा होता.

बेसावध अवस्थेत कोसळलेले संजय शाह आणि राजू दतला हे जबर जखमी झाले. त्या दोघांनाही तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, संजय शाह यांचा जीव वाचू शकला नाही. राजू दातला यांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. या अपघाताचा व त्यानंतर उडालेल्या गोंधळाचा व्हिडिओ मनाला चटका विडिओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

SL/KA/SL

20 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *