समृद्धी महामार्गावर गर्डर टाकताना अपघात, २० मृत्युमुखी

 समृद्धी महामार्गावर गर्डर टाकताना अपघात, २० मृत्युमुखी

ठाणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहापूर जवळील खुटाळी गावाजवळ समृद्धी महामार्गाच्या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असताना क्रेन आणि गर्डर कोसळले असून या घटनेत आतापर्यंत १८ मजूर मयत झाले तर 3 जण जखमी झाले आहेत.

जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, टीडीआरएफ ची टीम , अग्निशमन सह इतर टीम उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच महसूल प्रशासन घटनास्थळी उपस्थित असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे.

३१ तारखेच्या मध्यरात्री बाराच्या दरम्यान, सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे.
सदर क्रेन घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले.

या दुर्घटनेत १८ व्यक्तीचा मृत्यू झाला तर ३ व्यक्ती जखमी असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे.

ML/KA/SL

1 Aug. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *