एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा, चित्रपटाचा टिझर रिलिज

 एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा, चित्रपटाचा टिझर रिलिज

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगलीने देश हादरला होता. या दंगलीत गुजरातमधील गोध्रा शहरात झालेल्या भीषण हत्याकांडाने संपूर्ण देशावर अवकळा पसरली होती. या भीषण दंगलीला २२ वर्ष पूर्ण होत आहेत. गुजरात दंगल म्हणजेच गोध्रा हत्याकांडावर आधारित चित्रपट प्रदर्शित होणार आहे, लवकरच ‘एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ हा चित्रपट (Accident Or Conspiracy Godhra Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा टीझर आज लाँच करण्यात आला आहे. 1 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर शौरी, पंकज जोशी हे प्रतिभावान कलाकार आहेत. ‘एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’हा चित्रपट पीडितांच्या न्यायासाठी लढण्याचा प्रवास दाखवतो. 1 मार्च 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर शौरी, पंकज जोशी हे प्रतिभावान कलाकार आहेत. ‘एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’हा चित्रपट पीडितांच्या न्यायासाठी लढण्याचा प्रवास दाखवतो.

अभिनेता रणवीर शौरी आणि मनोज जोशी यांनी या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. ‘एक्सीडेंट ऑर कॉन्स्पिरसी गोध्रा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच निर्मात्यांनी लाँच केला. अभिनेता रणवीर शौरीने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. त्याने टीझर शेअर करत लिहिले की, #GodharaTeaser हे सर्व तुमचे आहे! हा अपघात किंवा षडयंत्र असेल तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा.’ रणवीरने ही पोस्ट करत प्रेक्षकांना आवाहन केले आहे.

चित्रपटात, रणवीर शौरीने एका वकिलाची भूमिका साकारली आहे. जो गोध्रा ट्रेन आगीत पीडितांच्या बाजूने लढताना दिसतो. चित्रपटाचे दिग्दर्शन एमके शिवाक्ष यांनी केले आहे. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्राहून अहमदाबादला जाणाऱ्या साबरमती एक्सप्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत 59 जणांचा मृत्यू झाला होता. या वेदनादायक घटनेला गुजरात दंगल असेही म्हणतात. ही घटना गोध्रा हत्याकांडाने देखील ओखळली जाते.सोशल मीडियावर सध्या या चित्रपटाच्या टीझर व्हायरल होत आहे. नेटिझन्स देखील या टीधरचे खूप कौतुक करताना दिसत आहे. एका यूजरने लिहिले की, ‘सत्य घटनांवर नक्कीच चित्रपट बनवायला हवा.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘या दंगलींना घटना म्हणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘बॉलिवूड आता या घटनांवर चित्रपट बनवत आहे याचा आनंद आहे. लोकांना सर्व गोष्टी माहित असाव्यात.’

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत ‘चांद बुझ गया’, ‘परजानिया’, ‘फिराक’ सारखे चित्रपट आणि माहितीपट तयार करण्यात आले आहेत.

SL/KA/SL

2 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *