अग्निवीर युवकाचा अपघात, उपचार दरम्यान झाला मृत्यू

वर्धा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील रहिवासी सागर मारोतराव सरोदे हे एक वर्षांपूर्वी भारत सरकारच्या अग्निवीर मधून भारतीय लष्करामध्ये नोकरीवर रुजू झाले होते. १९७ आर.टी रेजिमेंट चे जवान होते. उत्तरप्रदेश राज्याच्या फरीदापूर युनिट मध्ये कार्यरत होते. वाहन चालक म्हणून कार्यरत असताना राजस्थान मधील सुरजगड येथे त्यांच्या वाहनाचा चार दिवसांपूर्वी अपघात घडला. अपघातात सागर गंभीर जखमी झाल्याने दिल्ली येथील त्यांचा कमान रुग्णालयात २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला म्हणजे २५ जानेवारी ला उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
अग्निवीर युवक अपघातात गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान शहिद झाल्याने वर्धा जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनापूर्वी शोककळा पसरली आहे. आज २६ जानेवारी ला त्यांचं पार्थिव मूळ गावी वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगे येथे येणार आहे.
SL/KA/SL
26 Jan. 2024