आश्रम शाळेच्या बसला अपघात , दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू…
नंदुरबार दि ९ – नंदूरबार जिल्ह्यातील देवगुई घाट परिसरात आज दुपारी अनुदानित आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे आश्रमशाळेचे असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोमवारी शाळा सुरु होत असल्याने स्कुल बस मधून नंदुरबार जिल्हातल्या दुर्गम गावांतून विद्यार्थ्यांना आश्रम शाळेत घेउन जाण्यात येत होते. घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले. सर्व जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाला अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.ML/ML/MS