अभाविपची मुंबईच्या महाविद्यालयात जनजागरण यात्रा
मुंबई दि.24(एम एमसी न्यूज नेटवर्क): फ्यूचर कॉन्क्लेव्ह फॉर बेटर मुंबई या यात्रेच्या माध्यमातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यार्थिनीधी न्यास व स्टूडन्ट फॉर डेव्हलपमेंट संयुक्त विद्यमाने मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये मतदान जनजागृती व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून 6 ते 15 नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण मुंबई महानगरात दोन टप्प्यात जनजागरण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात भांडुप ते दादर व दुसऱ्या टप्प्यात वांद्रे ते वसई दरम्यान ही यात्रा काढण्यात येणार आहे. मतदारांनी जात, धर्म, वंश, पंथ किंवा इतर कोणताही प्रलोभनांना बळी न पडता विकास, विकासकामे आणि मुंबईचे भवितव्य यांना डोळ्यासमोर ठेवून मतदान करावे.असे आवाहन अभाविपचे बिपीन शुक्ला, अभिषेक पवार व गौरी देवी गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत द्वारे केले आहे.
या जनजागृती यात्रांमध्ये मुंबईतील रोजगार, मुंबईचे शहरी पर्यावरण, पुरेशी दळणवळणाची संसाधने, मुंबईकरांचे आरोग्य, आणि मुंबईकरांसाठी नवत्तापूर्ण रोजगाराभिमुख शिक्षण अश्या विविध मुद्यांवर महाविद्यालयं परिसरात चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
१५ दिवसाच्या या यात्रांमध्ये अभाविपचे १४०० कार्यकर्ते कॉलेज कॅम्पस मध्ये परीचर्चा, जागरूकतेसाठी गेट मिटिंग आणि स्वाक्षरी मोहीम तसेच अडीच लाख पत्रकांचे वितरण करण्यात येणार आहे.३० कार्यकत्यांची टीम होस्टेल्स, सोसायट्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन पथनाट्य सादर करणार असून तरुण मतदारांना वरील मुद्द्यांची जाणीव करून त्यांचे मतदानाचे हक्क बजावण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे आवाहन करणार आहे.असे अभिषेक पवार यांनी सांगितले.
SW/ML/SL
24 Oct. 2024