सोशल मीडियाच्या ओळखीतून अत्याचार, ब्लॅकमेल

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोशल मीडियावर ओळखीनंतर मैत्री केलेल्या तरुणाने २८ वर्षीय विवाहितेच्या खासगी क्षणांचे छायाचित्र काढून वारंवार अत्याचार केले. विविध कारणांवरून दागिने, पैसेही घेतले. हा प्रकार पीडितेच्या कुटुंबाला कळाला. कुटुंबाने तरुणाला समजावूनही सांगितले. मात्र, परिस्थिती बदलली नाही. पीडितेच्या कुटुंबाने अखेर त्याचे विमानतळ परिसरातून अपहरण करून बेदम झोडपले. १० तास एका खाेलीवर नेऊन गुप्तांगावर जखमा केल्या. सौरव चंद्रभूषण दंडिमे (२८, रा. मुकुंदवाडी) असे त्याचे नाव असून त्याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
२८ वर्षीय पीडितेच्या तक्रारीतील आरोपानुसार, एप्रिल २०१९ मध्ये तिची फेसबुकवर सौरवसोबत ओळख झाली. दीड महिन्यात मैत्री व क्रमाने भेटीही वाढल्या. २३ एप्रिल २०२२ रोजी सौरवला वाढदिवसानिमित्त पीडितेने सोन्याची अंगठी भेट दिली. त्याच दरम्यान सौरवचे पीडितेच्या घरी जाणेही वाढले. मात्र, त्यानंतर पीडितेने त्याला घरी येण्यास नकार दिला. संसार उद्ध्वस्त होईल, असे सांगून विनवण्या केल्या. सौरवने मात्र तिचे चोरून खासगी क्षणांचे काढलेले छायाचित्र दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू केले. त्याच्या मागणीनुसार त्याला पीडितेने अनेकदा मोठमोठ्या रकमा दिल्या. छायाचित्र डिलिट करण्यासाठी त्याने पीडितेला पैसे मागितले. तेव्हा त्याने ८ तोळ्यांच्या बांगड्या घेतल्या. आयफोन घेण्यासाठी पुन्हा सोन्याचा नेकलेस व ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने घेतले. Abuse, blackmail through social media identity
ML/KA/PGB
13 Dec 2023