मार्च महिन्यातही काटेपूर्णा अभयारण्यात मुबलक पाणी

 मार्च महिन्यातही काटेपूर्णा अभयारण्यात मुबलक पाणी

वाशिम, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काटेपूर्णा अभयारण्यात मार्च महिन्यातही नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असून नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे पडताच वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पानवट्यांमध्ये पाणी सोडण्याचे नियोजन वन विभागाने केले आहे.

वाशिम आणि अकोला जिल्ह्यात विस्तारलेल्या काटेपूर्णा अभयारण्याची ओळख महाराष्ट्रात ‘पाणी देणारे दंगल’ अशी असून या अभयारण्यात बिबट, हरीण, तरस, भेकर, ससे, रानडुकर, निलगाई आदी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी निवास आहे. उन्हाळ्यात नैसर्गिक जलस्त्रोत आटले की वनविभागाकडून कृत्रिम पाणवठे तयार करून, त्यामध्ये टँकरद्वारे पाणी सोडले जाते. मात्र काटेपूर्णा अभयारण्याची ओळखच पाणी देणारे जंगल असून, मार्च महिन्यात सुद्धा या अभयारण्यात नैसर्गिक जल स्त्रोतांमध्ये मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने एप्रिल महिन्यात कृत्रिम पाणवठ्यात पाणी सोडण्याचे वन विभागाचे नियोजन आहे.

काटेपूर्णा अभयारण्यातुन कावेरी आणि काटेपूर्णा या दोन नद्या वाहतात. नद्यांमुळे अभयारण्यातील बहुतांश जलस्त्रोतांना मार्च मध्ये पाणी दिसून येत आहे. यासोबतच वनविभागाकडून दरवर्षी वन्यप्राण्यांसाठी अभयारण्यात ४० कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येतात. नैसर्गिक जलस्त्रोत कोरडे पडताच या कृत्रिम पाणवठ्यात नियमित पाणी सोडले जाते अशी माहिती काटेपूर्णा अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांनी दिली आहे.

ML/ML/SL

11 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *