जुन्या पेन्शन योजना विषयावरून विधानपरिषदेत सभात्याग

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर २००५ नंतरच्या कालावधीत सेवेत रुजू झालेल्या १८लाख सरकारी , निमसरकारी कर्मचारी , शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी ही मागणी करत विधानपरिषदेत आज विरोधकांनी गदारोळ करत सभात्याग केला.Absenteeism in Legislative Council over old pension scheme issue
या गदारोळामुळे प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहाचं कामकाज १० मिनिटांसाठी दोनदा तहकूब करण्यात आलं होतं.
या कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने चर्चा घ्यावी अशी मागणी करत शिक्षक सदस्य कपिल पाटील , विक्रम काळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी स्थगन प्रस्ताव मांडला.
हे कर्मचारी शेवटचा उपाय म्हणून संपावर गेले आहेत , यामुळे प्रशासन व्यवस्था ठप्प होण्याची शक्यता आहे यामुळे लोकांचे हाल होण्याची शक्यता आहे तसंच याचा परिणाम परिक्षांवर देखील होऊ शकतो त्यामुळे सरकारने यावर निर्णय घ्यावा असं कपिल पाटील यांनी सांगितलं.
सरकार यासंदर्भात वेळकाढूपणा करत आहे , सुरू झाला तरी सरकार प्रतिसाद देत नाही असा आरोप विक्रम काळे यांनी केला.
मात्र उपसभापती नीलम गोर्हे यांनी हे स्थगन प्रस्ताव फेटाळून लावले,त्यामुळे विरोधकांनी हौद्यात येऊन घोषणाबाजी केली.
ML/KA/PGB
14 Mar. 2023