तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात

 तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भरतीची तयारी करणाऱ्या एका युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गर्भवती राहिल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केला. याप्रकरणी ३३ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एका पोलिस उपनिरीक्षकावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१७ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत शिवाजीनगर गावठाण येथे घडला आहे. किरण माणिक महामुनी (३८, रा. नागपूर) असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी किरण महामुनी पोलिस दलात उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. पीडित युवती पोलिस भरतीची तयारी करत असताना त्यांची किरण सोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने पीडितेला शिवाजीनगर गावठाण येथील एका घरी नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीने पीडित युवतीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून ती गर्भवती राहिली. हा प्रकार समजल्यानंतर किरण महामुनी याने पीडितेला जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये नेत इच्छेविरुद्ध गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे या करत आहेत.

Abortion by dragging a young woman into the net of love

ML/ML/PGB
18 Apr 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *