अभिनव बिंद्रा यांना मिळाला पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान

 अभिनव बिंद्रा यांना मिळाला पॅरिसमध्ये ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये ‘टॉर्च रिले’मध्ये भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकलेले अभिनव बिंद्रा यांना ऑलिम्पिक ज्योत घेऊन जाण्याचा सन्मान मिळाला आहे. शिवाय अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी)ने ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने सन्मानित केले आहे. ऑलिम्पिक चळवळीतील अतुलनीय कार्यासाठी बिंद्राला या पुरस्काराने गौरविण्यात आले. देशाला गौरव मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी अभिनव बिंद्राचे अभिनंदन केले. बिंद्राने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार हा आयओसीद्वारे एखाद्या व्यक्तीला दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमधील 142 व्या आयओसी सत्रात हा पुरस्कार सोहळा होणार आहे

ML/ML/PGB
26 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *