अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडाप्रकरणी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा, ९ वर्षांनी लागला निकाल

संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या अश्विनी बिंद्रे-गोरे हत्याकांडाचा निकाल 9 वर्षानंतर आला आहे. पनवेल सत्र न्यायालयाने बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अश्विनी बिद्रे यांचे कळंबोली येथून 2015 मध्ये अपहरण करून हत्या करण्यात आली होती. राज्य सरकारने हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली होती. एसआयटीने 80 जणांची साक्ष घेत कुरुंदकर याच्यासह तिघांवर हत्येचा ठपका ठेवला होता. हे प्रकरण खूपच गाजले होते. अखेर अभय कुरंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.