आष्टी तालुक्यातील पुंडी गावातील मंदिर, शाळा पाण्यात

बीड दि २८….आष्टी तालुक्यातील पुंडी गावातून मेहकरी नदीला पूर आला असल्याने नदीचे पाणी पुंडी गावात शिरले आहे. सर्व मंदिरे,शाळा या पुराच्या पाण्यात गेल्या असून या पुरामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे व जनावरांनसाठी बनवलेल्या मुरघासाचे प्रचंड नुकसान झाले आहे, प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी सरपंच प्रतिभाताई थोरवे यांनी केली आहे.ML/ML/MS