पालख्यांच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांची गर्दी…

 पालख्यांच्या दर्शनासाठी लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांची गर्दी…

पुणे दि २१:- जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे पुण्यात काल आगमन झालं असून त्यांचा आज पुण्यात मुक्काम आहे. पुण्यातील नाना पेठेत दोन्ही पालख्या हे मुक्कामाला असतात आज सकाळपासून मोठ्या संख्येने वारकरी तसेच पुणेकर नागरिक हे जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. शहरातील पेठ भागात आजूबाजूला पुणेकर नागरिक तसेच विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे.

पुण्यातील नाना पेठ येथील श्री निवडुंगा विठोबा देवस्थान ट्रस्ट येथील मंदिरात जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी आहे. तर भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिर येथे जगद्गुरु संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामी असून महिला व पुरुषांच्या दर्शनासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच दोन्ही मंदिरात तसेच आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलं आहे.लाखो भाविक तसेच पुणेकर नागरिक पालखीच्या दर्शनासाठी आले असून भवानी पेठेत मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात पालखी मुक्कामी असल्याने मोठ्या प्रमाणावर वारकरी हे पुण्यात दाखल झाले आहे.या अनुषंगाने वारकऱ्यांच्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे.ठिकठिकाणी वारकऱ्यांना थांबण्याची व्यवस्था तसेच त्याच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था विविध सामाजिक संस्था यांच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच पावसाच्या अनुषंगाने देखील सभा मंडप असेल तसेच वैद्यकीय व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे तर वारकऱ्यांसाठी जेवण,तसेच मालिश,कटिंग आणि विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *