दृष्टिहीन भक्तांसाठी प्रथमच ब्रेल लिपीतील आरती संग्रह …

 दृष्टिहीन भक्तांसाठी प्रथमच ब्रेल लिपीतील आरती संग्रह …

पुणे, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दगडूशेठ गणपतीला पहिला ब्रेल लिपीतील आरती संग्रह ब्लाईंड वेलफेअर असोसिएशन तर्फे आज अर्पण करण्यात आला. दृष्टिहीन लोकांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

वाचणे आणि ऐकणे यात फरक असून अंध लोकांना गणपतीची आरती वाचता यावी यासाठी नाशिक च्या ब्लाईंड वेलफेअर असोसिएशन तर्फे पहिल्यांदा ब्रेल लिपितील आरती संग्रह पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती समोर प्रकाशित करण्यात आला.

यावेळी पहिला आरती संग्रह यावेळी गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करण्यात आला. अंध बांधवाना यामुळे याचा लाभ घेता येणार असून यामध्ये 11 आरतीचा समावेश आहे. अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा, मारुती स्तोस्त्र, आणि माउलींच्या पसायदानाचा भावार्थ यांचा समावेश आहे. पुण्यातील सिद्धिविनायक या संस्थेने या संग्रहाला आर्थिक मदत केली असून त्यांच्या सहकार्याने 200 आरती चा संग्रह आता निर्माण करण्यात आला आहे.

यासाठी येणारा खर्च हा इतर संग्रहाच्या तुलनेने अधिक असून दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत करण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अरुण बारस्कर यांनी म्हटले आहे.

ML/KA/SL

27 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *