आपनं सुरु केलं डीपी कॅम्पेन

 आपनं सुरु केलं डीपी कॅम्पेन

नवी दिल्ली, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. पण आम आदमी पार्टीनं यावरुन दिल्लीत रान पेटवलं आहे. केजरीवालांच्या अटकेपासून पक्षानं तिथं आंदोलनं सुरु केली आहेत. तसेच केंद्र सरकारवर टीकात्मक कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्यातच आता आपनं डीपी कॅम्पेन सुरु केलं आहे. तसेच ज्यांचा मोदींना विरोध आहे त्या सर्व देशवासियांना आपले डीपी बदलण्याचं आवाहन केलं आहे.

आपच्या नेत्या आणि प्रवक्त्या आतिषी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “अरविंद केजरीवाल यांची प्रेरणा घराघरात पोहोचवण्यासाठी आज संपूर्ण देशभरात सोशल मीडियावर एक डीपी कॅम्पेनची सुरुवात आम्ही करत आहोत. आज दुपारी ३ वाजल्यापासून आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी आपले डीपी बदलणार आहेत” यावेळी डीपीसाठी त्यांनी एक फोटो देखील पत्रकार परिषदेत सादर केला. यामध्ये तुरुंगाच्या गजांआड असलेले केजरीवाल दिसत आहेत तसेच त्यावर ‘मोदी का सबसे बडा डर केजरीवाल’ असा संदेश लिहिला आहे.

SL/ML/SL

25 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *