दिल्लीतील शाळांच्या वाढीव शुल्कावरून आपने दिल्ली सरकारला घेरले

 दिल्लीतील शाळांच्या वाढीव शुल्कावरून आपने दिल्ली सरकारला घेरले

नवी दिल्ली, 7 : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी सोमवारी खासगी शाळांमधील शुल्क वाढीवरून भाजप सरकारवर हल्लाबोल केला. खासगी शाळांमधील वाढीव शुल्काच्या मुद्द्यावर त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना पत्र लिहिले आहे.

त्यात त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आदेश जारी करून ‘शाळांच्या हिशोबाचे ऑडिट होईपर्यंत पालकांकडून वाढीव फी वसूल करू नये’ अशी मागणी केली आहे. तसेच ज्या शाळांचा खर्च न्याय्य आहे. अशा शाळांनाच १ ते २ टक्के फी वाढ दिली जावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

भाजप सरकारला प्रश्न विचारताना सरकार ‘शिक्षण माफिया आहे की पालक’, असा टोमणा ही मारला लगावाला आहे. भाजप सरकारने पालकांची सोबत दयावी असे आव्हान केले आहे. आतिशी यांनी X वर पोस्ट करत लिहिले की, खाजगी शाळांच्या मनमानी शुल्कवाढीमुळे दिल्लीत संताप व्यक्त होत आहे. पालक शाळांबाहेर आंदोलन करत आहेत. यावर भाजप सरकारने मौन पाळले आहे. मी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.तसेच आता मुख्यमंत्री काय कारवाई करतात, यावरून कळेल की भाजप सरकार शिक्षण माफियांसोबत आहे की पालकांसोबत आहे.
आतिशी यांनी केलेल्या तीन मागण्या मध्ये वाढीव शुल्क तात्काळ थांबवावे. सर्व शाळांचे ऑडिट व्हायला हवे. ज्या शाळांचे शुल्क वाढ रास्त आहे अशा शाळांना एक ते दोन टक्के फी वाढ करण्याची परवानगी द्यावी.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *