दिल्लीत आप चा भाजपाला जोरदार धक्का

 दिल्लीत आप चा भाजपाला जोरदार धक्का

नवी दिल्ली,दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्ली विधानसभेवर सत्ता गाजवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आता  दिल्ली महापालिका निवडणुकीत २५० पैकी १३४ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे. आपच्या विजयामुळे भाजपची महापालिकेतील  १५ वर्षांची भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. भाजपने यावेळी  केवळ १०४ जागा  जिंकल्या आहेत.

या दिमाखदार विजयानंतर लोकांना संबोधित करताना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले,

“आम्हाला केंद्र सरकारची मदत हवी आहे. आम्हाला पंतप्रधान आणि केंद्राच्या आशीर्वादाची गरज आहे. या निवडणुकीमधून लोकांना सकारात्मक राजकारणाची आवश्यकता असून नाकारात्मक राजकारण त्यांनी दूर केलं आहे. मी सर्व पक्ष आणि उमेदवारांना आवाहन करतो की आजपर्यंत आपण राजकीय वाद घातले. मात्र आता आपल्याला एकत्र काम करायचं आहे. आम्हाला भाजपा आणि काँग्रेसचं सहकार्य हवं आहे. आपण एकत्र येऊन दिल्लीतील समस्या सोडवू.

दरम्यान महापालिका निवडणुकीत आपच्या जागा वाढल्या आणि बहुमताने सत्तादेखील आली. मात्र मतदारांची संख्या कमी झाली आहे. मुस्लिमबहुल परिसरात, झोपडपट्ट्यांचं प्रमाण अधिक असलेल्या भागांमध्ये आपच्या अनेक उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

पराभूत भाजपाने या निवडणूकीत पूर्ण ताकद पणाला लावली होती. बाराहून अधिक केंद्रीय मंत्री, भाजपची सत्ता असलेल्या ६ राज्यांचे मुख्यमंत्री, ७ खासदार तसेच शंभराहून अधिक पदाधिकारी दिल्ली पालिका निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार काम करत होते. इतके होऊनही भाजपला सत्ता गमवावी लागली.

SL/KA/SL

7 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *