सरन्यायाधीशांच्या हल्ल्याविरोधात आम आदमी पार्टी नागपूर तर्फे मुक आंदोलन

 सरन्यायाधीशांच्या हल्ल्याविरोधात आम आदमी पार्टी नागपूर तर्फे मुक आंदोलन

नागपूर, दि १४
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी, नागपूर तर्फे आज दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ (मंगळवार) रोजी संविधान चौक, नागपूर येथे मूक आंदोलन आयोजित करण्यात आले.

या आंदोलनाचे नेतृत्व श्री भूषण ढाकुळकर (प्रदेश संघटन सचिव), डॉ. शहीद अली जाफरी (प्रदेश सचिव), डॉ. अमेय ई. नारनवरे (शहर महासचिव), श्री रोशन डोंगरे (शहर संघटन मंत्री) व श्री प्रशांत मेश्राम (शहर अनुसूचित जाती सेल अध्यक्ष) यांनी केले.

या आंदोलनात कार्यकर्त्यांनी “संविधान बचाव”, “लोकशाही वाचवा”, तसेच “न्यायव्यवस्थेवरील हल्ल्याचा निषेध” असे विविध फलक घेऊन शांततेत आपला संताप व्यक्त केला.
मोठ्या संख्येने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते जव्वाद अहमद, इक्बाल रिझवी, प्रदीप पौनीकर, विशाल वैद्य, अलका पोपटकर, सचिन लोणकर , तेजराम मदन, हेमराज कुंभारे,मंजुषा पोफरे, प्रशांत अहिरराव, बाळू बनसोड , संघमित्रा मेश्राम, श्रीमती सीताबाई मेश्राम, पिंकी बारापात्रे, अंकुर ढोणे, मनोज डोंगरे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते

आंदोलनाद्वारे पक्षाने स्पष्ट संदेश दिला की —

“न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा कणा आहे. न्यायमूर्तीवर हल्ला हा केवळ व्यक्तीवर नव्हे, तर संविधान व लोकशाही मूल्यांवर हल्ला आहे. त्यामुळे असा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”

या आंदोलनात महिला, युवक, विद्यार्थी व विविध समाजघटकांतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. आंदोलन शांततेत पार पडले. KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *