आमिर खान, किरण रावने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट

बालेवाडी येथे रविवारी २३ मार्चला पाणी फाऊंडेशनचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची आमिर खान आणि किरण राव यांनी भेट घेतली. यावेळी दोघांनीही देशमुख कुटुंबियांना हिंमत ठेवण्याचा सल्ला दिला. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, त्यांचा मुलगा, संतोष देशमुख यांचा मुलगा यावेळी उपस्थित होते. त्यांच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.