कुंभे धबधब्यात ३५० फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू….

 कुंभे धबधब्यात ३५० फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू….

कुंभे धबधब्यात ३५० फूट खोल दरीत पडून तरुणीचा मृत्यू….

अलिबाग, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील निजामपूर विभागातील अर्धवट राहिलेला कुंभे जलविद्युत प्रकल्प, कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहचताना लागणारे मनमोहक धबदबे हे पर्यटकांना भुरळ घालू लागले आहेत. मात्र यातच अती उत्साह दाखवणाऱ्या तरुणीचा खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कुंभे येथील हे पर्यटन जीवघेणे ठरत आहेत. या कुंभे धबधब्यात १६ जुलै रोजी मुंबई येथून ७ मित्रमैत्रिणी सह अवनी कामदार नावाची तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती. दुपारी अवनी वाहत्या धबधब्याच्या पाण्यासह ३५० फूट खोल दरीत पडल्याची माहीती मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी, माणगांव पोलीस टीम, माणगांव तहसीलदार तसेच साळुंके रेस्क्यू टीम माणगाव, सी स्केप रेस्क्यू टीम महाड,कोलाड रेस्क्यु टीम,महावितरण कर्मचारी,
आरोग्य यंत्रणा हे घटनास्थळी दाखल झाले.

घटनास्थळी सर्व यंत्रणा झाल्यानंतर तब्बल ६ तासांच्या रेस्क्यु नंतर अवनीला ३५० फूट खोल दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने तसेच एकूण ६ तास अन्न , पाण्याविना राहिल्यामुळे व अशक्तपणामुळे अवनी कामदार हिचा माणगांव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या तरुणीला वाचविण्याचे अथक प्रयत्न केले परंतु अवनी कामदार हिला वाचविता आले नाही.

ML/ML/PGB
17 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *