कोल्हापूरच्या तरुणाने जिंकला ‘मिस्टर गे इंडिया २०२३’ किताब
पुणे, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
पुणे येथे मिस्टर गे इंडिया आणि मिस्ट एलजीबीटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘मिस्टर गे इंडिया’ या स्पर्धेची (Mr. Gay India Contest) अंतिम फेरीत कोल्हापूरच्या विशाल पिंजानी यांने जिंकली आहे. राजपिपळा संस्थानाचे राजपुत्र आणि स्वतः समलिंगी असल्याचे जाहीरपणे मान्य करणारे मानवेंद्र सिंह गोहिल यांच्या हस्ते विशालला ‘मिस्टर गे इंडिया २०२३’चा किताब प्रदान करण्यात आला. केरळच्या अभिषेक जयदीप याने स्पर्धेचे उपविजेतेपद जिंकले आहे. या स्पर्धेत विविध राज्यांतून २० स्पर्धक सहभागी झाले होते.
आता विशाल दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात ‘एलजीबीटीक्युआयएप्लस” समुदायासाठी ‘अभिमान’ या स्वयंसहाय्यता गटाद्वारे विशाल काम करतो.
‘मिस्टर गे इंडिया २०२३’ हा किताब जिंकल्या नंतर आपल्या भावना व्यक्त करताना विशाल म्हणाला,“जे अजूनही आपली ओळख शोधत आहेत आणि आव्हानांना तोंड देत आहेत त्यांच्यासाठी आशेचा किरण बनणे हे माझे ध्येय आहे. तुम्ही एकटे नाहीत. तुमची ओळख व्हॅलिड आहे, तुमची ओळख सुंदर आहे आणि तुम्ही जसे आहात तसे प्रेम आणि इतरांनी स्वीकारण्यास पात्र आहात,सर्वात आधी मी माझे कुटुंब, माझे मित्र आणि माझ्या सहकाऱ्यांचे माझ्यावरील अतूट विश्वासाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. तुमचे प्रेमच मला प्रेरणा देते, या प्रेमाबद्दल मी कोल्हापूर येथील माझ्या कुटुंबाचेही मनापासून आभार मानू इच्छितो. माझे जन्मगाव कोल्हापूर आणि आपल्या वैविध्यपूर्ण आणि सुंदर भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात, माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आणि माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.”
SL/KA/SL
7 Oct. 2023