दिव्यांग मुलाचा विश्व विक्रम

 दिव्यांग मुलाचा विश्व विक्रम


मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईतील एका 14 वर्षाच्या दिव्यांग मुलाने अरबी समुद्रातील काश्याचा खडक ते रेवस बंदर हे 5 किलोमीटरचे अंतर अवघ्या 55 सेकंदात पार करून एक नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला आहे.
प्रिथीश प्रशांत शिरसाठ असे या जलतरण पटू दिव्यांग मुलाचे नाव असून,तो चेंबूर येथील रहिवाशी आहे. कुर्लाच्या ऑर्केट इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता ८ वी च्या वर्गात तो शिक्षण घेत आहे.

16 शस्त्रक्रिया 

प्रिथीश हा जन्मापासुन सेरेब्रल पाल्सी (स्पास्तिक डायप्लेजीया) च्या सोबतीने वाढलेला विशेष पॅरा दिव्यांग जलतरण पटू आहे. हालचालीवर नियंत्रण करणे अवघडल्या सारखे असताना तसेच चालतांना पायात कातरी पडत असताना त्यावर मात करण्यासाठी प्रिथीशवर जवळजवळ 16 शस्त्रक्रिया झालेल्या आहे.
22 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या अरबी समुद्रातील काश्याचा खडक ते रेवस बंदर हे 5 किलोमीटरचे अंतर अवघ्या 55 सेकंदात पार करून प्रिथीशने एक नवा विश्व विक्रम नोंदविला आहे .
प्रिथीशला एवढ्या मोठ्या आजाराने ग्रासलेले असतांना देखिल त्याचे प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी सतत सकाळ व सायंकाळ तीन ते चार तास पोहण्याचा सराव करून घेत प्रिथीशला जलतरण पटू म्हणून तयार केले आहे.
प्रिथीशला समुद्रात पोहण्याचा कोणताही अनुभव नसताना प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी प्रिथीशला पोहण्यात निपूण केले आहे. या नव्या विश्व विक्रमा मध्ये सोनकांबळे सरांचा मोलाचा वाटा आहे.असे प्रिथीशची
आई योगिता प्रशांत शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
प्रिथीशला समुद्रातील पाण्यात प्रोत्साहन देण्याकरिता राष्ट्रीय जलतरण पटु यशगरी सोनकांबळे, राष्ट्रपती व पंतप्रधान पुरस्कार प्राप्त राष्ट्रीय जलतरण पटु स्वयंम विलास पाटील, डॉ. प्रकल्प पाटील (बालरोग तज्ञ), डॉ. राजेंद्र खरात आणि स्वयंम फाऊंडेशनच्या विद्या पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.असे प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांनी सांगितले.

पॅरो ऑलम्पीक मध्ये भाग घेण्याचा मानस

यावेळी प्रिथीशने पॅरो ऑलम्पीक व जगातील अनेक खाड्या पोहून जाण्याचा मानस व्यक्त केला . त्याच्या या कौतुकास्पद कामगिरी बद्दल सर्वत्र अभिनंद होत आहे.

विश्वविक्रम करणेकरिता महाराष्ट्राचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर व हौशी जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर हे उपस्थित होते. महाराष्ट्र हौस जलतरण संघटनेचे महाराष्ट्राचे पंच म्हणून निलकंठ अखाडे यांनी काम पाहिले.A world record for a disabled child

ML/KA/PGB
23 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *