मीरा-भाईंदर युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविकेचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मीरा-भाईंदर मधून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का युवा सेनेच्या शहराध्यक्षासह माजी नगरसेविका यांचा मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने आज मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तारा घरत आणि युवासेनेच्या जिल्हाधिकारी पवनतारा घरत यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांच्यासह स्वप्नील नवले, स्वप्नील शिर्के, धर्मेंद्र सिंह, मयूर म्हात्रे, तुषार पाटील, समीर पाटील, अजय मोहन, विपीन घरत, नम्रता घरत, सचिन घरत, जय म्हात्रे, दिलीप पाटील, कल्पना पाटील, शिला भालसिंह यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, विक्रम प्रताप सिंह तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. A woman from the Gopal community became a police inspector
ML/ML/PGB
15 Jun 2024