रेशीम बागेमध्ये चेंगराचेंगरी एका महिलेचा मृत्यू

नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेशीमबाग येथील सुरेशभट सभागृहाच्या गेटवर चेंगराचेंगरी मध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून पोलीसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे मात्र आयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.
भारतीय जनता पार्टी नागपूर शहरातर्फे बांधकाम कामगार आणि घरेलू कामगारांची नोंदणी तसेच कीट वाटप शिबिराचे आयोजन नागपुरातील सुरेशभट सभागृह येथे आयोजन करण्यात आले आहे, त्यातील साहित्य वाटप 8 ते 11 मार्च पर्यंत होणार होते. मात्र आज सकाळी 6 वाजेपासून हजारो महिला जमा झाल्या. कार्यक्रम स्थळाचे गेट सकाळी 10 वाजता उघडण्यात आल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला.
मनू राजपूत असे मृत महिलेचे नाव असून मृत महिला 61 वर्षाची आहे. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात यावा अशी मागणी यातील काही महिलांनी केली आहे.
SL/KA/SL
9 March 2024