पावसाळ्यात भरला रानभाजी महोत्सव

वाशिम, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता सोहळ्या निमित्त आज कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उदघाटन वाशीम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी आत्मा कार्यालयाच्या परिसरात केले.
रानभाजी महोत्सवामध्ये शेतकरी महिला बचतगट, महिला आर्थिक विकास महामंडळाचे बचतगट आणि उमेद बचतगटांनी तसेच शेतकरी गटांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले . या महोत्सवात
कटुले, गोंदन फुलोरा, कसन भाजी, अंबाडी, कारमोडी, कपाडफोडी, रानभेंडी, शेंदोलीकंद, फांज, तरोटा, झिनीया, घोरपडी, गुळवेल, सुरजकंद, घोरकाकडी, चुचुची भाजी, कामोनी, टंटनी, केना, म्हैसवेलाकी पाने, भराटी, गुळमेंडी, माळकामोनी, काबीलवेल, हडसन, रानकरडी, कवठ, जंगली मशरुम, बेल, करडई, रानशेपू, तांदुळकुंद्रा, मोठा वावडींग, कळमकोसला, रानघोळ, करडुची भाजी, काठेमाठ भाजी, पांढरामाठ, शेवग्याचा फुलोर, पानफुटी, वासनवेल भाजी, कंबरमोडी, पिंपळ कावळा, नाळची भाजी आणि तुपगेल भाजी आदी रान भाज्यांचा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन रानभाज्यांची उपयुक्तता त्यांचे आहारातील महत्व या विषयीची माहिती जाणून घेतली. तसेच नागरीकांनी आपल्या दैनंदिन आहारामध्ये रानभाज्यांचा समावेश करावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले. A wild vegetable festival held during the rainy season
ML/KA/PGB
14 Aug 2023