गुप्तधनाच्या लालसेतून गेला एकाचा बळी

 गुप्तधनाच्या लालसेतून गेला एकाचा बळी

यवतमाळ, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात प्रथमच जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दारव्हा येथील एका व्यक्तीचा गुप्तधनाच्या लालसेतून बळी गेला असून या व्यक्तीचे नाव देवराव रामजी बदुकले आहे . तो आणि त्याचे काही मित्र वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे गुप्तधन काढण्यासाठी गेले. मात्र घरातील भुयाराचे खोदकाम करताना देवराव च्या अंगावर ढाच्या कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला.

देवराव चा मृत्यू झाल्यावर तेथील अन्य सहभागी आरोपींनी देवरावचा मृतदेह दारव्हा तालुक्यातील माहुली शिवारातील एका विहिरीत टाकला. सदर घटना घडल्यानंतर दारव्हा पोलिसांनी आतापर्यंत तीन व्यक्तींना अटक केली आहे. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच जादूटोणा विरोधी कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपींनी देवराव बदुकलेचा मृत्यू हा ढाचा कोसळल्यानेच झाल्याची पोलिसांना सांगितले.

ML/KA/SL

9 Oct. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *