अति दुर्मिळ अलबिनो मण्यार प्रजातीचा पांढरा साप आढळला…
वाशिम, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशिम शहरातील कुंभारपुरा परिसरात भारतातील सर्वात जास्त विषारी असलेल्या मण्यार प्रजातीचा पांढरा साप आढळला असून तो अतिदुर्मिळ असल्याची माहिती सर्पमित्र गणेश फुलउंबरकर यांनी दिली आहे. मण्यार हा साप दिसायला मुख्यत्वे काळा असतो पण पकडलेला साप हा अल्बीनो असून हा पांढरा आहे याचे कारण म्हणजे अल्बीनो सापांमध्ये मेलनिन घटकाची कमतरता असते या मुळे या सापाचा रंग पांढरा दिसतो.
असे लाखात एखाद्याच सापाच्या बाबतीत घडते. हा साप निशाचर असून मुख्यतः मानवी वस्तीच्या जवळ आणि जंगलात आढळतो. दरम्यान, या अतीदुर्मिळ प्रजातीच्या सापाला पकडून वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ML/KA/SL
12 July 2023