पुरुषांची देखील अनोखी वटपौर्णिमा…
सिंधुदुर्ग, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : संपूर्ण राज्यात वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी होत असून महिलांची वडाची पूजा करण्यासाठी धांदल सुरु आहे. सिंधुदुर्गात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे म्हणून महिला आजच्यादिवशी वडाची पूजा करतात आणि वर मागतात. मात्र सिंधुदुर्गात गेल्या चौदा वर्षांपासून पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी केली जाते.
जन्मोजन्मी हीच पत्नी लाभू दे अशी प्रार्थना देखील केली जाते. कुडाळ येथे गेल्या 14 वर्षांपासून न चुकता वटपौर्णिमेला पुरुषमंडळी महिलांप्रमाणे यथासांग विधिवत वडाची पूजा करून, वडाला फेऱ्या मारून वटपौर्णिमा साजरी करतात. नेहमी पत्नीनेच व्रत करायचं या रुढीला छेद देत पुरुषांच्या या अनोख्या धाडसी पावला बद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.
ML/KA/SL
3 June 2023