शेणाचा इंधनावर चालणारा अनोखा ट्रॅक्टर
इंग्लंड, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंधनाच्या दरामध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे पर्यांयी इंधन स्रोतांचा पर्याय जगभरत सुरू आहे. त्यातच शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने इंधनाच्या वाढत्या दरामुळे शेतीच्या मशागत खर्चातही वाढ होते. यावर उपाय म्हणून ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी एक नामी युक्ती शोधून काढली आहे. येथील बेनामन या कंपनीने चक्क जनावरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या इंधनावर चालणारा ट्रॅक्टर विकसित केला आहे.
या ट्रॅक्टरचे नाव न्यू हॉलंड टी – 17 असे ठेवण्यात आले आहे. शेणापासून चालणाऱ्या या ग्रीन ट्रॅक्टरला सीएनएचए इंडस्ट्रीयल नावाच्या अॅग्रीकल्चरल कंपनीने मिथेन एनर्जीचे प्रोडक्ट बनविणाऱ्या बेन्नामन ( Bennamann ) कंपनीशी करार करुन तयार केले आहे. न्यू हॉलंड टी – 17 हा ट्रॅक्टर 270 हॉर्स पॉवरचा असून तो गायीच्या शेणावर उत्तम रित्या चालतो. डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टर प्रमाणेच तकदवान आहे. या ट्रॅक्टरमुळ प्रदुषणही कमी होतं. त्यामुळे पर्यावरणासाठीही हा ट्रॅक्टर फायदेशीर आहे. विशेष म्हणजे डिझेलवर चालणाऱ्या ट्रॅक्टरच्या तुलनेत हे ट्रॅक्टर चालवण्याचा खर्चही कमी आहे.
गायचे शेण फ्यूजिटीव्ह मिथेनच्या रूपातील गॅस तयार करते. ज्याला एका प्रोसेसिंग युनिटमध्ये ट्रीट तसेच कम्प्रेस करून लो इमिशन फ्युएलमध्ये परावर्तित केले जाते. त्यासाठी यात क्रायोजेनिक टँकही लावण्यात आला आहे. ज्यात गायीच्या शेणापासून तयार होणारा बायो मिथेन – 162 डीग्रीवर ठेवला जातो. आणि तो ट्रॅक्टरला पॉवर देतो. त्याशिवाय क्रायोजेनिक टँकचा वापर करून मिथेनला डीझेल सारखे वापरता येते.
SL/KA/SL
19 Jan. 2023