खगोलप्रेमींसाठी पर्वणी, उद्या पहाटे पाहा चंद्र-शुक्र युती
मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
उद्यापासून दिवाळीला सुरुवात होत आहे. पृथ्वीवरील दिवाळी सोबतच उद्या खगोलप्रेमींना आकाश दिवाळीची पर्वणी पहायला मिळणार आहे. पूर्व क्षितिजावर चंद्र-शूक्र युतीची अपूर्व अनुभूती उद्या घेता येणार आहे. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी आणि आपल्या पृथ्वीला सर्वात जवळ असलेला शूक्र ग्रह पहाटे पूर्व क्षितिजावर अत्यंत ठळक स्वरूपात दर्शन देत असून ९ नोव्हेंबर रोजी या ग्रहाची चंद्रासोबत युती घडुन येत आहे.
पहाटेच्या वेळी आपल्या भागात हे दोन्ही खगोल एकमेकांना अधिक जवळ युती स्वरूपात असतील, तर काही भागात पीधान युती होईल. काही कालावधीपर्यंत शूक्र ग्रह चंद्रबिंबाआड जाईल. यादिवशी शुक्र ग्रह उत्तर रात्री ३.१५ च्या सुमारास तर चंद्र ३.३० च्या सुमारास पूर्व क्षितिजावर उदय पावून सकाळी ९.१५ च्या सुमारास आकाश मध्याशी येतील. याच दिवशी दिवसा सुद्धा शूक्र दर्शन होऊ शकते.
चंद्र व शूक्र ग्रह कन्या राशीत असून चंद्राची अकरावी तर शूक्र ग्रहाची नवमीची कला असेल. चंद्र आणि शुक्र हे दोन्ही खगोल एकमेकांच्या अगदी जवळ असतांनाचे दृश्य सर्व आकाश प्रेमींनी पहाटे ४ ते ६ या वेळात पाहता येणार आहे.
SL/KA/SL
8 Nov. 2023