परिसरात धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद

 परिसरात धुमाकूळ घालणारी वाघीण जेरबंद

चंद्रपूर दि २७ :चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील वाघोली-बुटी गाव परिसरात धुमाकूळ घालणारी वाघिण अखेर जेरबंद झाली आहे. तीने गेल्या 20 दिवसात 2 ग्रामस्थाना ठार केले होते.

गावात येऊन ग्रामस्थांवर हल्ला करणाऱ्या वाघिणीला ठार करा अशी ग्रामस्थांची मागणी होती. वनविभागाने सुमारे 50 ट्रॅप कॅमेरे आणि 100 कर्मचाऱ्यांसह चालविली वाघिणीसाठी शोधमोहीम राबविली होती. अखेर विविध जागी लावलेल्या पिंजऱ्यापैकी व्याहाड खुर्द जंगलात दोन ते अडीच वर्षाची वाघिण आढळली. वनपथकाने वाघाला डार्ट मारून बेशुद्ध करत विशेष वाहनाने शुश्रुषा केंद्रात रवाना केले. प्राथमिक वैद्यकीय चौकशी करून वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे.

ML/KA/SL

27 May 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *