भारतात HMPV च्या रूग्णसंख्येत वाढ, तिसरा रूग्णही आढळला
चीननंतर भारतातही ह्यूमन मेटान्यूमोचा प्रादुर्भाव बघायला मिळतो आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे एका दोन महिन्यांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्याच्यावर अहमदाबाद येथे उपचार सुरू आहेत. तर बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाली. त्यांनतर तिथे आणखी तीन महिन्यांच्या चिमुकलीला या विषाणूची लागण झाली आहे. दोन्ही मुलांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे आढळून आली होती, त्यानंतर सध्या मुलीला डिस्चार्ज देण्यात आला असून मुलावर उपचार केले जात आहेत आणि तो बरा होत आहे. दरम्यान, हा विषाणू महाराष्ट्राच्या वेशीवर पोहोचला आहे. त्यानुसार राज्य सरकारनेही यासंदर्भात योग्य खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.