बांग्लादेशात रेल्वेचा भीषण अपघात

ढाका, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राजधानी ढाकापासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या भैरबमध्ये दोन रेल्वे एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला आहे. या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, किशोरगंजमधील भैरब येथे दुपारी मालगाडीची पॅसेंजर ट्रेनला धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे.
स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ‘आतापर्यंत 12 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मदतकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो.’ काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ‘अनेक लोक ट्रेनखाली अडकले होते.’ मात्र, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
स्थानिक माध्यमांनी अपघातग्रसत डब्यांमध्ये अनेक जखमी अडकल्याचा दावा केला आहे. त्यामुळे अपघातातील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्याने रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आला आहे, त्यामुळे हा अपघात झाला आहे.
SL/KA/SL
23 Oct. 2023