BMW व Mercedes च्या शर्यतीच्या नादात टॅक्सीचा भीषण अपघात

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर सोमवारी सकाळी बीएमडब्ल्यू व मर्सिडीज चालकांनी शर्यत लावली होती. दोघेही वाऱ्याच्या वेगाने आपापल्या कार चालवत होते. काही अंतर पुढे गेल्यावर समोर एक टॅक्सी होती. त्याचवेळी या दोन्ही कारचालकांचं कारवरील नियंत्रण सुटलं. या दोन्ही आलिशान गाड्यांनी टॅक्सीला धडक दिली. कार पूलावरच उलटली. सुदैवानी टॅक्सीमधील प्रवासी वाचले. वरळी पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दोन्ही गाड्या जप्त केल्या. तसेच मर्सिडीज व बीएमडब्ल्यू चालकांना अटक केली आहे.