मोहदरी घाटात भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू
नाशिक, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील सिन्नरजवळ मोहदरी घाटात कारचे ब्रेक फेल झाल्याने तीन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात ५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. A terrible accident at Mohdari Ghat
नाशिक येथील एका महाविद्यालयामधील विद्यार्थी स्विफ्ट कारने मित्राच्या लग्नासाठी गेले होते. सायंकाळच्या दरम्यान नाशिकला परतत असताना मोहदरी घाटात त्यांच्या कारचे अचानक टायर फुटले आणि कार विरुद्ध दिशेला जात डिव्हायडर ओलांडून थेट दुसऱ्या लेनला जावून आणखी एका वाहनाला धडकली. त्यामुळे मोहदरी घाटात तीन वाहनांचा विचित्र अपघात घडला.
अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातील मृतांमध्ये महाविद्यालयीन ३ विद्यार्थिनी आणि २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हर्षल बोडके, मयुरी पाटील, शुभम ताडगे आणि अन्य दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर साक्षी घायाळ, साहिल वरके, गायत्री फड आणि ईनोवा कारमधील सुनील दत्तात्रय दळवी व अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. काही जखमींना सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात तर काहींना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ML/KA/SL
10 Dec. 2022