राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी आता विशेष लसीकरण मोहीम

 राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी आता विशेष लसीकरण मोहीम

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील क्षयरोगाचे निर्मूलन करून २०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली.

याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता, त्यावर पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, मनिषा चौधरी, राजेश टोपे आदींनी उप प्रश्न विचारले. राज्य क्षयमुक्त २०२५ साली होऊ शकते का तसेच या रोगाचे मूळ कारण काय याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं ही मंत्री म्हणाले.

२०२२ साली राज्यात २, ३३,८७२ क्षय रोग रुग्ण होते तर मुंबईत ६५,४३२ क्षय रुग्ण होते, २०२४ साली राज्यात १,१०,८९६ तर मुंबईत ३०,५१९ क्षय रुग्ण आहेत अशी माहिती देखील मंत्री सावंत यांनी दिली. दाटीवाटीने असलेल्या लोकसंख्येच्या ठिकाणी या रोगाचे प्रमाण अधिक असते त्यामुळे मुंबईत देखील विशेष समिती अभ्यास करून अहवाल देईल असं सावंत यांनी सांगितलं.

आंगणवाड्या आता राज्य अर्थसंकल्पातून

राज्यातील आंगणवाड्या उभारणी , दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मोनिका राजळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर भास्कर जाधव यांनी उप प्रश्न विचारला.

राज्यातील सर्व आंगणवाडया स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषद निधी , जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दुरुस्ती , नवीन बांधकामे केली जातात असं तटकरे यांनी सांगितलं. A special vaccination drive now to eradicate tuberculosis in the state

ML/ML/PGB
11 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *