कफ सिरप उत्पादक कंपन्यांची होणार विशेष तपासणी मोहीम

 कफ सिरप उत्पादक कंपन्यांची होणार विशेष तपासणी मोहीम

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात १०८ कंपन्या कफ सिरपचे उत्पादन करतात त्यातील ८४ उत्पादकांची तपासणी करण्यात आली आहे, त्यातील १७ जणांचे नमुने त्रुटी ग्रस्त होते , पैकी ४ जणाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे, ६ जणांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई सुरू आहे अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली.

महाराष्ट्रातील एका कंपनीच्या दोष युक्त सिरप मुळे परदेशात ६६ मुलांचा बळी गेला आहे त्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आशीष शेलार यांनी लक्षवेधी मध्ये केली होती. पुन्हा यावर नव्याने तपासणी मोहीम राबवून कारवाई केली जाईल अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली.A special inspection campaign will be conducted on cough syrup manufacturing companies

पतसंस्थांसाठी समिती

राज्यातील पतसंस्था मधील कर्ज वितरण प्रकरणी येत असलेल्या अडचणी आणि ठेवी सुरक्षित करण्यासाठी विम्याची व्यवस्था आदींसाठी येत्या पंधरा दिवसात एक विशेष तज्ञ समिती नेमण्याची तसेच अधिवेशन काळात यावर निर्णय घेऊ अशी घोषणा सहकार मंत्री अतुल सावे यांनी संबधित लक्षवेधी वर केली , प्रकाश आबिटकर यांनी ती उपस्थित केली होती, बाळासाहेब थोरात यांनी समिती नेमण्याची मागणी केली होती.

ML/KA/PGB
3 Mar. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *