आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर घोषणाचा पाऊस
मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पालिका इतिहासात प्रथमच पालिका आयुक्तांनी सादर केलेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्रांच्या सूचनेनुसार आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणाचा पाऊस पडण्यात आला आहेत.
यावर्षीच्या अर्थसंकल्प तब्बल 52619 कोटी रुपयांचा सादर करण्यात आलाय. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बजेटमध्ये 14.52 टक्के म्हणजे 6670 कोटी रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी 45949 कोटींचे बजेट होते. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ सूचविण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिला, दिव्यांगा साठी भरीव तरतूद
महापालिकेच्या यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. तसेच जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्या प्रकल्पांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्रकल्प वेळेत मार्गी लागण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात सात एसटीपी प्रकल्पांसाठी 2792 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून महापालिका सामाजिक प्रभाव उपक्रम.महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्यासाठी भरीव तरतूद केली आहे.
मुंबई महापालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 2570 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.राज्य सरकारकडून मालमत्ता करासह विविध येणे थकबाकी 7223 कोटी इतकी आहे. थकबाकी देण्याची पालिकेची राज्य सरकारला विनंती करण्यात आली आहे . मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात मुंबईचा वाढत प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदा दीड हजार कोटी रुपयांची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
बेस्टला 800 कोटीची मदत
मुंबई पालिकेच्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात बेस्टला 800 कोटी रुपयांची मदत दिली जाणार तर कोस्टल रोडसाठी 3545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. इलेट्रीक वाहनांची वाढती संख्या लक्षात घेत या बजेटमध्ये मुंबई महापालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार असून हि उभारणी खासगी कंपन्यांद्वारे होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागिदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्नपालिका करणार आहे.
उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या कोस्टल रोडसाठी 3545 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.अर्थसंकल्पात बेस्टला 800 कोटी रुपयांची मदत दिली जाणार असून यामुळे कामगारांची थकीत देणी देणे बेस्टला शक्य होणार आहे.
विशेष तरतूद
सागरी किनारा रस्ता प्रकल्प 3545 कोटी
प्राथमिक शिक्षणाकरीता तरतूद 3347.13 कोटी
मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प (STP) 2792 कोटी रस्त्यांच्या सुधारणेकरीता तरतूद 2825.06 कोटी
पूलांकरिता एकूण तरतूद ₹2100 कोटी (रेल्वे रुळांवरील आणि रुळांखालील बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पूलांचे MRIDCL द्वारे निष्कासन आणि पुनर्बांधणी 400 कोटी या कामासह)
पर्जन्य जलवाहिन्यांकरिता तरतूद 2570.65 कोटी (बृहन्मुंबईमध्ये मिठी नदी आणि इतर नदी/नाले रुंदीकरण/वळविण्याचे काम ( टप्पा ॥ व III) 654.44 कोटी, नद्यांच्या पुनर्जिवनाकरीता तरतूद 582.31 कोटी, उदंचन केंद्राची उभारणी (मोगरा, माहूल उदंचन केंद्र) 200 कोटी या कामांसह)
घनकचरा व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प 366.50 कोटी
आश्रय योजनेकरीता तरतूद 1125 कोटी
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प (GMLR) 1060 कोटी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाच्या
आधुनिकीकरण आणि दर्जोन्नतीकरीता तरतूद 133.93 कोटी देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाकरीता तरतूद 13.69 कोटी
आरोग्याकरिता विशेष तरतूदी 2023-24
आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च ₹6309.38 कोटी इतका असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12% इतका आहे.
भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास 110 कोटी
गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम 110 कोटी एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरण 95 कोटी
कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाचे प्रस्तावित बांधकाम 75 कोटी
सायन रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास 70 कोटी एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय 60 कोटी
वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण 53.60 कोटी
एल विभागातील संघर्ष नगर येथे रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या भूखंड क्र. 11A/4 चा विकास 35 कोटी
ऐकवर्थ कृष्ठरोग रुग्णालयाच्या आवारात वसतीगृहाचे बांधकाम 28 कोटी
नायर दंत महाविद्यालयाचे विस्तारीकरण 17.50 कोटी ई विभाग, कामाठीपुरा येथील सिद्धार्थ / मुरली देवरा नेत्र रुग्णालयाचा पुनर्विकास 12 कोटी
ओशिवरा प्रसूतीगृहाची दुरुस्ती/ पुनर्बांधकाम 9.50 कोटी
के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटरची दर्जोन्नती 7 कोटी
आर. एन. कूपर रुग्णालय येथे वैदयकीय महाविद्यालयाचे बांधकाम 5 कोटी
टाटा कंपाऊंड आणि हाजी अली वसतीगृहाचे बांधकाम 2 कोटी
रुग्णालयामध्ये प्रोटॉन थेरेपी कर्करोग के.ई.एम. रुग्णालयाच्या बांधकामाकरीता तरतूद 1 कोटी
जल व मलनिःसारण प्रकल्पासाठी भांडवली तरतूद
मुंबई मलनिःसारण प्रकल्प (एमएसडीपी) 3566.78 कोटी
पाणी पुरवठा प्रकल्प 1376 कोटी
जल अभियंता 780 कोटी
जलवहन बोगद्यांची बांधकामे 433 कोटी
मलनिःसारण प्रचालन 364 कोटी
2000 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा नविन जलशुध्दीकरण प्रकल्प 350 कोटी
मुंबई मलनिःसारण सुधारणा कार्यक्रम (एमएसआयपी) 300 कोटी
200 द.ल.लि. प्रतिदिन निःक्षारीकरण प्रकल्पाची मनोरी येथे उभारणी 200 कोटी
कुलाबा येथे ‘आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रीया केंद्र’ 32 कोटीA shower of announcements ahead of the upcoming municipal elections
ML/KA/PGB
4 Feb. 2023